Wednesday, 27 July 2016

टॅबलेटची खरेदी

<iframe style="width:120px;height:240px;" marginwidth="0" marginheight="0" scrolling="no" frameborder="0" src="//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?ServiceVersion=20070822&OneJS=1&Operation=GetAdHtml&MarketPlace=IN&source=ac&ref=tf_til&ad_type=product_link&tracking_id=httpsanganak5-21&marketplace=amazon&region=IN&placement=B01IHIZIXA&asins=B01IHIZIXA&linkId=&show_border=true&link_opens_in_new_window=true">
</iframe>

Wednesday, 2 December 2015

टॅबलेट


परवाच शाओमी कंपनीचा टॅबलेट आणला आहे. प्रथम जेव्‍हा ३ वर्षांपूर्वी आमच्‍या घरासमोरून टॅबलेट घेऊन रस्‍त्‍यातून ई-मेल चेक करत जाणारी कॉलेजची मुले बघितली होती तेव्‍हा उगाच शो-ऑफ करत आहेत असे वाटले होते. कदाचित तसेच असावे. तरी देखील आता असे लक्षात येऊ लागले आहे की प्रत्‍येक वेळी डेस्‍कटॉप उघडण्‍यापेक्षा टॅबलेट वापरणे अतिशय सोईचे आहे. किंडलवरील पुस्‍तके वाचण्‍यासाठी तर टॅबलेट अतिशय छान आहे. म्‍हणजे नुसते किंडल डिव्‍हाईस घेण्‍यापेक्षा टॅबलेट घेणे फायदेशीर आहे.
या टॅबलेटची बॅटरी इतर टॅबलेटस् च्‍या तूलनेत जास्‍त चालते. किंमत सामान्‍य वापरकर्त्‍याला परवडणारी आहे. दृष्‍य, रंगसंगती उत्तम आहेत.

tablet

Saturday, 3 October 2015

कॉम्‍प्‍युटर शिकताय?

कॉम्‍प्‍युटर शिकण्‍याचे वय कोणते? कॉम्‍प्‍युटर शिकायचा म्‍हणजे नक्‍की काय शिकायचे? असे प्रश्न आपल्‍यापैकी अनेकांना पडत असतात. पण कॉम्‍प्‍युटर शिकायचा तरी कुठे? आता या प्रश्नांची उत्तरे मिळाली असे वाटत आहे कारण कॉम्‍प्‍युटर शिकण्‍याचे अभिनव तंत्रज्ञान. या पद्धतीत प्रत्‍यक्ष शिक्षकाची गरज नसते, किंवा अगदी मर्यादित प्रमाणात असते. संपूर्ण कोर्स, ऑडिओ, व्हिडिओ व प्रेझेंटेशन (स्‍लाईट-शो) स्‍वरूपात वेबसाईटवर ठेवलेला असतो असतो. जसे आपण स्‍वतःच्‍या ई-मेल अकाउंटमध्‍ये लॉग-इन करतो तसेच आपल्‍या  कॉम्‍प्‍युटर क्‍लासच्‍या अकाउंटमध्‍ये लॉग-इन करायचे व हेडफोन कानाला लाऊन शिकायला सुरूवात करायची. चार चार मिनिटांची प्रॅक्टिकलवर आधारित छोटी लेक्‍चर्स असतात व लेक्‍चरच्‍या नंतर असते इंटरअॅक्टिव्‍ह सेशन, प्रॅक्टिस सेशन किंवा अॅसेसमेंट/परीक्षा. हे वर्णन आहे 'महाराष्‍ट्र नॉलेज कॉरपोरेशन लिमिटेड' या राज्‍य सरकारच्‍या कंपनीतर्फे घेतल्‍या जाणा-या एम.एस.सी.आय.टी. कोर्सचे. एम.एस.सी.आय.टी. म्‍हणजे महाराष्‍ट्र  स्‍टेट सर्टिफिकेट कोर्स इन इन्‍फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी.

एम.एस.सी.आय.टी.च्‍या पत्रकातील भाषेमध्‍ये सांगायचे झाले तरः
'पुस्‍तकापासून सुरूवात न करता, थेट काम, कामातून ज्ञान आणि या ज्ञानाचा वापर करून अधिक आकर्षक व आनंददायी काम. करिअर आणि सामाजिक दृष्‍ट्या उपयोगी व फलदायी कामे करण्‍यासाठी विद्यार्थ्‍याला तयार करणे हाच या प्रशिक्षणाचा मुख्‍य हेतू आहे. एम.के.सी.एल. ने आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे इंटरअॅक्टिव्‍ह मल्टिमिडिया शैक्षणिक साहित्‍य (लर्निंग कंटेंट) विकसित केले आहे. हे लर्निंग कंटेंट तुम्‍हाला इ.आर.. या प्रणालीद्वारे उपलब्‍ध होते. या प्रणालीची रचना विद्यार्थ्‍यांना शैक्षणिक, मूल्‍यमापन, लर्निंग कंटेंट तसेच सहयोगाने शिक्षण अशा विविध सुविधा देण्‍यासाठी करण्‍यात आली आहे. स्‍वतःच्‍या आवडीनुसार, स्‍वतःच्‍या वेगाने आणि सहयोगाने तुम्‍हाला शिकता येईल. यामध्‍ये असलेल्‍या साखळी अभ्‍यासक्रमामुळे शैक्षणिक गुणवत्ता मिळते आणि विविध - टेक अ चॅलेंज च्‍या माध्‍यमातून दैनंदिन जीवनात उपयोगी गोष्‍टीही सहज शिकता येतात.'

पुढील वेबसाईटसवर या कोर्सेसविषयी कोर्सविषयी अधिक माहिती मिळू शकेल. www.mkcl.org/mscit बेसिक कोर्स.
www.mkcl.org/wave व्‍यवसायाभिमुख कोर्स (वेब डिझायनिंग, प्रोग्रॅमिंग आणि फायनान्शिअल अकाउंटिंग इत्‍यादी).
www.mkcl.org/klic ६ महिन्‍याचा डिप्‍लोमा कोर्स (डिजीटल आर्टस, हार्डवेअर आणि नेटवर्किंग, अॅडव्‍हान्‍स्‍ड इन्‍फर्मेशन टेक्‍नॉलॉजी, स्‍मॉल बिझिनेस मॅनेजमेंट, बँकिंग व फायनान्‍स).
http://easy.mkcl.org इंटरनेटचा उपयोग करून घरबसल्‍या जागतिक पातळीवरची कामे करा आणि आर्थिक प्राप्‍ती करा.

आपल्‍या जवळपासच्‍या अनेक सरकारमान्‍य कॉम्‍प्‍युटर क्‍लासेसमध्‍ये हे कोर्सेस मराठी, हिंदी व  इंग्रजी भाषेमध्‍ये उपलब्‍ध आहेत. फी देखील वाजवी आहे. प्रवेश घेण्‍यासाठी काहीही विशेष शिक्षण गाठीशी असण्‍याची गरज नाही तसेच वयाची अट नाही. तर मग बेसिक कोर्सपासून सुरूवात करणार?
 x x x

Friday, 13 February 2015

निरुपयोगी होणारी अॅप्‍लीकेशन सॉफ्टवेअर्स

अनेक वर्षे माझ्या कॉम्‍प्‍युटरवर विंडोज एक्‍स. पी. ऑपरेटिंग सिस्टिम (ओ.एस.) होती. त्‍यावेळी विकत घेतलेले एका प्रथितयश कंपनीचे मराठी टायपिंग सॉफ्टवेअर (Licensed Version) आता विंडोज - 8.1 ऑपरेटिंग सिस्टिमवर चालत नाही. आता मी स्‍वतःचे पैसे खर्च करून आणलेले मराठी टायपिंगचे सॉफ्टवेअर, विंडोज - 8.1 ओ.एस. वर चालविण्‍यासाठी काय करावे अशा विचारात पडलो आहे. आता हे सॉफ्टवेअर मी कसे वापरायचे यासंबंधी या ब्‍लाॅगच्‍या वाचकांनी कृपया आपली मते कळवावीत. माझा ई-मेल आय.डी. आहे. tuition.mk@gmail.com

Thursday, 13 June 2013

इंटरनेटचा वापर, इंटरनेटवरील आर्थिक व्‍यवहार आणि इतर . . .

कॉम्‍प्‍युटर व इंटरनेटचा प्रसार घराघरांत झाल्‍यापासून ब-याच गोष्‍टी करण्‍याची पूर्वापार पद्धत बदलून गेली आहे. म्‍हणजे आता तुम्‍हाला घरातील मोबाईल, गॅस, वीज ही सर्व बिले भरण्‍यासाठी चेक खरडावे लागत नाहीत, व चेक वेळेवर भरण्‍यासाठी धावाधाव करावी लागत नाही. याऐवजी सर्व उपयुक्‍त सेवा/सुविधा तुमच्‍या क्रेडिट कार्डाला जोडल्‍या की दर महिन्‍याला तुमची बिले क्रेडिट कार्डावरून आपसूक भरली जातात. तुम्‍ही फक्‍त एक करावयाचे, क्रेडिट कार्डच्‍या बिलचा चेक, देय तारखेच्‍या दहा-बारा दिवस आधी, न चुकता संबंधित बँकेच्‍या ड्रॉप बॉक्‍स मध्‍ये जमा करायचा. (दहा-बारा दिवस आधी यासाठी की, कधी बँक हॉलिडे, बंद यामुळे संबंधित रक्‍कम ड्यू डेटच्‍या आधी व्‍यवस्थितपणे योग्‍य त्‍या खात्‍यात जमा व्‍हावी. क्रेडिट कार्डाच्‍या बिलाची रक्‍कम न चुकता वेळेवर भरली की क्रेडिट कार्ड कंपनीच्‍या दृष्‍टीने तुम्‍ही  विश्वासार्ह ग्राहक होता व त्‍याचा लाभ तुम्‍हाला क्रेडिट कार्डच्‍या अखंडित सेवेमध्‍ये मिळतो. म्‍हणजे तुमचे क्रेडिट लिमिट तर वाढतेच पण तुमचे क्रेडिट कार्ड एक्‍सपायर व्‍हायच्‍या आधी महिनाभर नवे क्रेडिट कार्ड संबंधित क्रेडिट कार्डाची कंपनी न चुकता पाठविते. मला हा अनुभव तीन-चार वेळा आला आहे.) जर तुम्‍हाला तुमच्‍या क्रेडिट कार्डाचा उपयोग मर्यादित ठेवायचा असेल तर तुमच्‍या बँकेच्‍या अकाउंटमधून इंटरनेट बँकिंगद्वारे ही रक्‍कम विनासायास भरता येते. तुम्‍ही तुमच्‍या बँकेच्‍या अकाउंटमध्‍ये गॅस, वीज इत्‍यादी बिले तुमच्‍या अकाउंट मध्‍ये रजिस्‍टर्ड केलीत की ती संबंधित तारखेला न चुकता तुमच्‍या बँक अकाउंटमध्‍ये दिसू लागतात. त्‍यासाठी प्रत्‍यक्ष कागदावर छापलेली कॉपी/प्रिंटआऊट तुमच्‍या घराच्‍या  पत्त्यावर १०-१५ दिवसांनी आली तरी काळजी करण्‍याचे कारण नाही. जेव्‍हा तुम्‍ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे/तुमच्‍या बँक अकाउंटमधून तुमची बिले भरता तेव्‍हा प्रत्‍येक वेळी बँकेचे नाव, संबंधित व्‍यवहाराची तारीख वेळ व 'ट्रान्‍झॅक्‍शन नंबर' संबंधित बिलावर लिहून ठेवावी किंवा स्‍वतःकडे एका डायरीमध्‍ये नोंद करावी यामुळे आपल्‍याकडे बिल वेळेवर भरल्‍याचा पुरावा रहातो. यासाठी प्रत्‍येक वेळी आपल्‍या बँक अकाउंटच्‍या संबंधित पानाची, ऑनलाईन रिसिटची प्रिंट काढण्‍याची गरज नाही. तसेच तुम्‍ही जेव्‍हा क्रेडिट कार्डचे बील ऑनलाईन किंवा चेकद्वारे भरता तेव्‍हा आपण भरत असणारी रक्‍कम कशासाठी भरत आहोत याची खात्री करून घ्‍यावी. तसेच क्रेडिट कार्डच्‍या बिलामध्‍ये टोटल बरोबर केली आहे ना याची खात्री करून घ्‍यावी. बँक अकाउंटमधून आपली बिले भरतांना आपण आपल्‍या बँकेच्‍या वेबसाईटवरच नक्‍की लॉग इन करत आहोत, याची खात्री करणे आवश्‍यक ठरते कारण आपल्‍या बँकेच्‍या नावाशी साधर्म्‍य असणारी दुसरी एखादी वेबसाईट असेल तर त्‍यावर लॉग इन झाल्‍यास आपली ऑनईन बँकिंगशी संबंधित माहिती एखाद्या चोरट्याचा हातात लागण्‍याची बरीच शक्‍यता असते.
रेल्‍वे/विमानाची तिकिटेच नाही तर आता सिनेमा/नाटकाची तिकिटे देखील इंटरनेटचा वापर करून काढता येऊ लागली आहेत. आपल्‍या आवडत्‍या लेखकाचे पुस्‍तक इंटरनेटवरून घेणा-यांची संख्‍या गेल्‍या  काही महिन्‍यांत लक्षणीयरित्‍या वाढली आहे. हे सर्व आपल्‍याला सांगायचे कारण हेच की, या सोईच्‍या  पाठीमागे इंटरनेट व त्‍याच्‍याशी संबंधित भलीमोठी यंत्रणा (सिस्टिम) उभी आहे. या यंत्रणेचा वापर करूनच या सर्व सोई-सुविधा आपल्‍याला वापरता येतात.
शहरांमधील वाढता ट्रॅफिक, इंधनाचे आकाशाला भिडत चाललेले दर, रस्‍त्‍यांमधील गर्दी या सर्वांचा विचार करता इंटरनेट बँकिंग व ऑनलाईन शॉपिंग हे पर्याय आज वरदान ठरत आहेत. अगदी साधी गोष्‍ट, पूर्वी आपल्‍याला, पुस्‍तक घ्‍यायचे असले की आपण घराजवळच्‍या बुक शॉप मधे जाऊन संबंधित पुस्‍तकाची चौकशी करायचो. माझा अनुभव असा आहे की, आता पन्नास शंभर रूपयाचे पुस्‍तक घ्‍यायचे असेल व घराजवळच्‍या दुकानामध्‍ये ते उपलब्‍ध नसेल तर तो दुकानदार ते पुस्‍तक उपलब्‍ध नाही असे बेफिकीरीने सांगतो. पूर्वी असे होत नसे. पुस्‍तक मागवून देतो असे उत्तर यायचे. आता बहुधा पन्नास-शंभर रूपयांचे एक पुस्‍तक प्रकाशकाकडून मागविणे दुकानदाराला परवडत नसावे.
आता मात्र अनेक प्रकाशकांच्‍या वेबसाईट सुरू झाल्‍या आहेत. या वेबसाईटवरून तुम्‍हाला हवी ती पुस्‍तके खरेदी करता येतात. आपल्‍या पसंतीच्‍या प्रकाशकांच्‍या वेबसाईट गूगल किंवा इतर सर्च इंजिन्सवरून शोध पहाव्‍या किंवा थेट संबंधित प्रकाशकांकडे फोन करून त्‍यांची वेबसाईट आहे का याची विचारणा करावी कारण वेबसाईटवर आपल्‍याला संबंधित प्रकाशकाच्‍या अनेक पुस्‍तकांची माहिती मिळते.
दैनंदिन जीवनासाठी आवश्‍यक सोई-सुविधांची बिले भरणे किंवा इतर ऑनलाईन व्‍यवहार करतांना आपल्‍याला सावधगिरी बाळगावी लागते. बरेच जण इंटरनेट इत्‍यादी सुविधा उपलब्‍ध असून देखील ऑनलाईन व्‍यवहार करणे टाळतात. याचे कारण आपल्‍या यंत्रणांविषयी असणारा अविश्वास, जर आपल्‍या देशात उद्या एखादा क्रेडिट कार्ड घोटाळा झाला तर क्रेडिट कार्ड धारकांना त्‍यांचे पैसे परत मिळतील की नाही याबद्दल शंकाच आहे. त्‍यामुळे जे कोणी क्रेडिट कार्ड वापरतात त्‍यांनी स्‍वतःच आपली बँकेमधील रक्‍कम सुरक्षित राहील याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. हीच गोष्‍टी डेबिट कार्डचा वापर करणा-या व इंटरनेट बँकिंगचा वापर करून थेट आपल्‍या बँक अकाउंटमधून रक्‍कम भरून वस्‍तू किंवा सेवा विकत घेणा-या सर्वच लोकांना देखील लागू आहे. एकदा तुमची माहिती इंटरनेटवर गेली की ती माहिती पुढे कोण बघणार हे तुमच्‍या हातात नसते. आता तर ऑनलाईन बँकिंग हा इतका परवलीचा शब्‍द झाला आहे की ते ऑनलाईन बँकिंग वापरतांना त्‍याच्‍याशी संबंधित धोके सोईस्‍करपणे नजरेआड केले जातात. थोडक्‍यात आता ऑनलाईन खरेदी करणे, ऑनलाईन व्‍यवहार करणे ही एक गरज झाली आहे. मात्र ऑनलाईन सुविधा वापरणारे लोक या ऑनलाईन पद्धतीमधील धोक्‍यांची माहिती करून घेत नाहीत किंवा अशा व्‍यवहारांमध्‍ये आपल्‍यावर काही जबाबदारी/धोका असतो हे त्‍यांना माहितच नसते किंवा ते सोईस्‍करपणे त्‍या धोक्‍यांकडे दुर्लक्ष करतात. सोय होते आहे ना, मग थोडीशी डोळेझाक करावयाची अशी ही प्रवृत्ती आहे.


माऊस क्लिक करताना सावधानः
ऑनलाईन खरेदी विक्रीमध्‍ये म्‍युच्‍युअल फंड देखील मागे नाहीत. तुमची म्‍यु‍च्‍युअल फंडाची युनिटस आता डीमॅट अकाउंट मध्‍ये जमा करतात येतात. जसे तुमचे शेअर्स डीमॅट अकाउंटमध्‍ये दिसतात तशीच तुमची म्‍युच्‍युअल फंडची युनिटस देखील त्‍याच अकाउंटमध्‍ये दिसतात. मात्र हे सर्व करतांना या सोईंचा वापर करणा-याला म्‍हणजे आपल्‍याला एक अॅग्रीमेंट म्‍युच्‍युअल फंड कंपनीबरोबर करावे लागते. या अॅग्रीमेंटमध्‍ये  असा उल्‍लेख असतो की माझ्या म्‍युच्‍युअल फंड अकाउंटमधून झालेल्‍या सर्व व्‍यवहारांची जबाबदारी फक्‍त माझीच असेल. त्‍यासाठी म्‍युच्‍युअल फंड कंपनीला जबाबदार धरले जाणार नाही. या सर्व अटी व शर्ती अगदी छोट्या टाईपमध्‍ये छापलेल्‍या असतात. थोडक्‍यात सांगायचे म्‍हणजे, आपल्‍या पैशांची सुरक्षितता आपणच पहायला हवी. बड्या कंपन्‍या त्‍यांची ही जबाबदारी अतिशय चतुराईने झटकून मोकळ्या झालेल्‍या  आहेत. एका प्रकारे या कंपन्‍यांनी असे मान्‍य केलेले आहे की इंटरनेटवरील व्‍यवहारामध्‍ये धोका आहे. इंटरनेटवर व्‍यवहार करतांना तुमच्‍या कॉम्‍प्‍युटरमध्‍ये इंटरनेटचा उपयोग करून घुसखोरी करणा-याकडून या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो. इंटरनेट वापरतांना जेव्‍हा तुम्‍ही एखाद्या 'Accept' नावाच्‍या बटनवर तुमच्‍या माऊसच्‍या मदतीने क्लिक करता तेव्‍हा याचा अर्थ संबंधित अटी व शर्ती तुम्‍हाला मान्‍य आहेत असा केला जातो.
जेव्‍हा तुम्‍ही ऑनलाईन बँकिंगचा वापर करता तेव्‍हा, तुम्‍हाला तुमचा अकाउंट पाहण्‍यासाठी, तुमच्‍या संबंधित बँकेने तुम्‍हाला दिलेला कस्‍टमर आय.डी. बँकेच्‍या इंटरनेट बँकिंगच्‍या वेबसाईटवर टाईप करावा लागतो. यानंतर तुमचा पासवर्ड तुम्‍हाला टाईप करावा लागतो व दोन्‍ही गोष्‍टी अचूक असतील तरच तुमच्‍या बँक अकाउंटचे वेब पेज उघडले जाते. थोडक्‍यात काय तर तुम्‍ही तुमच्‍या घरी बसून इंटरनेट कनेक्‍शनद्वारे, तुमच्‍या बँकेचा कॉम्प्‍युटर वापरता व त्‍यावरील तुमचे अकाउंट पाहता. या इंटरनेट बँकिंग चा वापर करणा-यांसाठी देखील काही सुरक्षिततेचे उपाय आहेत.
-याच वेळा एखादी ई-मेल तुम्‍हाला येते. वरवर पहाता ती ई-मेल बँकेकडून आली आहे असेच वाटते कारण त्‍या ई-मेलमध्‍ये बँकचा लोगो वगैरे पद्धतशीरपणे असतो. आपल्‍याला संशय देखील येत नाही की ही ई-मेल कोणी चोरट्याने पाठवली असेल. अशा ई-मेल मध्‍ये खालील मजकुरासारखा किंवा त्‍याच्‍याशी साधर्म्‍य दाखविणारा मजकूर असून तुमची वैयक्तिक माहिती (जन्‍मतारीख किंवा बँकेचा कस्‍टमर आय.डी.) विचारलेली असते.
'तुम्‍ही ताबडतोब तुमचा कस्‍टमर आय.डी. आम्‍हाला कळवा. न कळवाल तर तुमचा बँक अकाउंट २४ तासांच्‍या आत बंद होईल.'

आपल्‍यासारखी संगणक व इंटरनेटचा वापर करणारी व नोकरी किंवा व्‍यवसाय करणारी व्‍यक्‍ती बँका वगैरे संस्‍थांच्‍या अटी व शर्ती यांना पाळण्‍याच्‍या मानसिकतेची असते. यामुळे उगीच नसती कटकट नको असा विचार करून अशी व्‍यक्‍ती आपली गोपनीय माहिती सदर ई-मेल ला 'Reply' म्‍हणून पाठविते किंवा सदर ई-मेल वरील एखाद्या लिंकमध्‍ये टाईप करते.
तुमच्‍या बँकेच्‍या वेबसाईटसारखी दिसणारी ही वेबसाईट भलत्‍याचीच असते. अशा वेबसाईटवर तुम्‍ही अज्ञानातून, भीतीमुळे स्‍वतःच टाईप केलेली तुमची गोपनीय माहिती थेट संबंधित वेबसाईट चालविणा-या कॉम्‍प्‍युटरवर धाडली जाते. या माहितीचा उपयोग करून तुमच्‍या बँक अकाउंटमधून भलीमोठी रक्‍कम काढून घेण्‍याचा संभव असतो. फसवणुकीच्‍या या प्रकाराला फीशिंग (Fishing) असे म्‍हणतात. ऑनलाईन व्‍यवहार करतांना कोणती व्‍यवधाने सांभाळावी लागतात याविषई अधिक माहिती तुमच्‍या बँकेच्‍या वेबसाईटवर पहाता येईल.
यासाठी माझ्यापुरते सुरक्षिततेचे काही उपाय मी वापरतो कारण ऑनलाईन व्‍यवहार न करणे हे काही आजच्‍या बदललेल्‍या परिस्थितीमध्‍ये शक्‍य नाही. असे करावयाचे तर काळाच्‍या वेगाशी सुसंगत असा आपला वेग रहाणार नाही. 'धरले तर चावते, सोडले तर पळते' असे हे प्रकरण आहे. अत्‍याधुनिक सोई-सुविधा, तंत्रज्ञान वापरून आपले आयुष्‍य सुलभ, सोपे तर करून घ्‍यावयाचे पण अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाच्‍या  अतिरेकापाई फसवणुकीच्‍या किंवा नुकसानीच्‍या सापळ्यात मात्र सापडायचे नाही अशी माझी धारणा आहे. तुम्‍ही देखील यांचा अवश्‍य विचार करावा. सर्वात पहिला उपाय म्‍हणजे सर्व बँक खात्‍यांसाठी इंटरनेट बँकिंगची सुविधा घेणे आवश्‍यक आहे का? याचा विचार करून त्‍याप्रमाणेच (इंटर)नेट बँकिंगची सुविधा घ्‍यावी. ज्‍या खात्‍यांमध्‍ये मोठ्या रकमा असतील त्‍यांना शक्‍यतो (इंटर)नेट बँकिंगची सुविधा जोडू नये. अतिशय मर्यादित रक्‍कम (इंटर)नेट बँकिंगच्‍या खात्‍यामध्‍ये ठेवावी. हे खाते क्रेडिट कार्डाचे व इतर बिल पेमेंट, इन्‍शुरन्‍स पेमेंट, ऑनलाईन खरेदी या कामांसाठी वापरावे.
नेट बँकिंगमध्‍ये क्रेडिट कार्डद्वारे केलेले पेमेंट व डेबिट कार्डद्वारे असे दोन प्रकार सध्‍या माझ्या वापरामध्‍ये आहेत. डेबिट कार्डाद्वारे केलेले पेमेंट म्‍हणजे थेट स्‍वतःच्‍या बँक अकाउंटमधून केलेले पेमेंट. यामधील दुसरा पर्याय अधिक सुरक्षित आहे कारण तुमच्‍या बँक अकाउंटमध्‍ये जर १ लाख रुपये असतील तर त्‍यापेक्षा जास्‍त खर्च नेट बँकिंगचा उपयोग करून देखील कोणीही करू शकणार नाही. मात्र कोणी तुमच्‍या क्रेडिट कार्डाचा दुरूपयोग केला तर तुमची अक्षरशः वाट लागू शकते. यामुळे शक्‍यतो अपरिचित वेबसाईटवर क्रेडिट कार्ड वापरायचे नाही, म्‍हणजेच तुम्हाला ज्‍या वेबसाईटवर व्‍यवहार करतांना सुरक्षिततेविषयी खात्री आहे त्‍याच वेबसाईटवर आपल्‍या क्रेडिट कार्डचा नंबर टाईप करावयाचा किंवा तुमच्‍या दृष्‍टीने खात्रीलायक वेबसाईटवरून उत्‍पादन व सेवा विकत घेण्‍यासाठीच क्रेडिट कार्ड वापरावयाचे.

जेव्‍हा तुम्‍ही तुमच्‍या कॉम्‍प्‍युटरवरून एखादा ऑनलाईन व्‍यवहार करता उदाहरणार्थ जेव्‍हा तुम्‍ही  तुमच्‍या घरी बसून रेल्‍वेचे ऑनलाईन तिकिट काढता तेव्‍हा तुमच्‍या कॉम्‍प्‍युटरला जोडलेल्‍या इंटरनेट कनेक्‍शनचा वापर करून तुम्‍ही रेल्‍वेच्‍या कॉम्‍प्‍युटरमधील माहिती (किती तिकिटे उपलब्‍ध आहेत इत्‍यादी) पाहू शकता व त्‍या कॉम्‍प्‍युटरवर तुमच्‍या तिकिटासाठी नोंदणी देखील करू शकता. अशा वेळी तुमच्‍या   कॉम्‍प्‍युटरवरून एक सांकेतिक संदेश रेल्‍वेच्‍या कॉम्‍प्‍युटरकडे पाठविला जातो. अशा कॉप्‍युटरच्‍या संदेशांची एक भाषा आहे. या भाषेला एच.टी.पी.पी. (Hypertext Transfer Protocol) म्‍हणतात. आपली संवादाची भाषा जशी व्‍याकरणाच्‍या नियमांनी बांधलेली आहे तशीच ही कॉम्‍प्‍युटरची भाषा काही नियमांनी बांधलेली असते. त्‍या एकसमान नियमांमुळे प्रत्‍येक संदेशाचा काही विशिष्‍ट अर्थ असतो. या अर्थानुरूप संदेश स्‍वीकारणारा कॉम्‍प्‍युटर त्‍या संदेशाला उत्तर देतो. यामुळे ही कॉम्‍प्‍युटरची भाषा वापरतांना सुसूत्रता येते व वापरकर्त्‍यांची फसवणुक होण्‍याची शक्‍यता कमी होते. या कॉम्‍प्‍युटरच्‍या संदेशांच्‍या एच.टी.पी.पी. नावाच्‍या भाषेची सुधारित आवृत्ती आहे एच.टी.पी.पी.एस. ही भाषा वापरून बनविलेल्‍या वेबसाईटच्‍या  सुरुवातीला https अशी अक्षरे असतात. समजा या वेबसाईटवरून एखादा संदेश/निरोप तुमच्‍या बँकेच्‍या  वेबसाईटला पाठविला तर https या सुविधेमुळे तुम्‍ही ज्‍या वेबसाईटवरून काही खरेदी करत आहात त्‍या  वेबसाईटची वैधता तपासून पाहिली जाते व यामुळे फसवणुकीचा धोका रहात नाही.
आयुष्‍य सोपे व सुलभ करण्‍यासाठी जशी तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे त्‍याचप्रमाणे क्रेडिट कार्ड धारकांना फसविण्‍यासाठी वापरण्‍यात येणा-या युक्‍यादेखील प्रगत होत आहेत. तुम्‍ही तुमचे क्रेडिट कार्ड कितीही सुरक्षित ठेवले तरी एखाद्या गाफील क्षणी तुम्‍ही तुमच्‍या क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती निष्‍काळजीपणे कोणाला तरी देता. अशा प्रकारे आपल्‍या क्रेडिट कार्डची माहिती देणे टाळा. क्रेडिट कार्डशी संबंधित फसवेगिरी करणा-यांचा नेहमीचा डाव म्‍हणजे, कस्‍टमर सर्व्हिस रिप्रेझेंटिटिव्‍ह म्‍हणून ते तुम्‍हाला फोन करतात व तुमच्‍याकडून तुमच्‍या क्रेडिट कार्डविषयी गोपनीय माहिती विचारून घेतात. यामुळे तुमचा क्रेडिट कार्ड नंबर किंवा अन्‍य गोपनीय माहिती जसे जन्‍मतारीख या गोष्‍टी फोनवरून दुस-या कुणाला सांगतांना अत्‍यंत सतर्क असावे लागते. बँक किंवा तत्‍सम संस्‍था कधीही अशी माहिती विचारण्‍याकरिता फोन करीत नाहीत. जर तुम्‍ही तुमच्‍या क्रेडिट कार्डच्‍या मागे दिलेल्‍या हेल्‍पलाईन नंबरवर स्‍वतः फोन केला असेल आणि/किंवा क्रेडिट कार्डशी संबंधित/बँकशी संबंधित अधिका-यांना जर तुम्‍ही स्‍वतः फोन केला असेल तसेच अत्‍यंत आवश्‍यक असेल तरच क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती फोनवरून द्या. अगदी आवश्‍यक तेवढीच क्रेडिट कार्ड काढा/वापरा. एका कुटुंबासाठी एक क्रेडिट कार्ड माझ्या मते पुरेसे असते. अर्थात प्रत्‍येक कुटुंबामध्‍ये वेगवेगळी परिस्थिती असल्‍यामुळे आपापली गरज ओळखून क्रेडिट कार्ड सेवा घ्‍यावी. अनावश्‍यक क्रेडिट कार्ड असल्‍यास त्‍या अनुषंगाने लक्षात ठेवायची माहिती, पासवर्ड इत्‍यादी वाढत जाते. इंटरनेटवर क्रेडिट कार्ड वापरतांना जपून वापरा - सध्‍या ऑनलाईन शॉपिंग करणा-यांची संख्‍या वाढत चालल्‍यामुळे इंटरनेटरवर चोरटे देखील क्रेडिट कार्ड धारकांना फसविण्‍याकरिता ऑनलाईन आले आहेत. तुमच्‍या क्रेडिट कार्डची माहिती मागणा-या कुठल्‍याही लिंकवर क्लिक करणे टाळा. या लिंक सुरक्षित भासल्‍या तरी त्‍या तुमची गोपनीय माहिती मिळविण्‍याचे माध्‍यम असतात. क्रेडिट कार्ड सुविधा देणा-या कंपन्‍या/बँका अशी माहिती त्‍यांच्‍या लिंकद्वारे कधीही ऑनलाईन विचारत नाहीत. तसेच तुमच्‍या बँकेच्‍या  किंवा क्रेडिट कार्डच्‍या अकाउंटमध्‍ये लॉगइन करतांना संबंधित वेबसाईटचा अॅड्रेस चेक करा. तो नक्‍की योग्‍य त्‍या संस्‍थेचा आहे ना याची प्रत्‍येक वेळी खात्री करून घ्‍या.
आपले दर महिन्‍याचे क्रेडिट कार्डचे बिल नीट तपासून घ्‍या. त्‍यामध्‍ये काही विसंगती/चुका आढळत नाहीत ना हे पहा. जर काही विसंगती आढळली तर क्रेडिट कार्ड कंपनीच्‍या कस्‍टमर केअर विभागामध्‍ये  ताबडतोब फोन करून स्‍पष्टिकरण विचारा. जर क्रेडिट कार्ड चोरीस गेले तर ताबडतोब क्रेडिट कार्ड कंपनीच्‍या कस्‍टमर केअर फोन नंबरवर फोन करून आपले क्रेडिट कार्ड ब्लॉक करा. यामुळे तुमच्‍या क्रेडिट कार्ड वरून कोणताही व्‍यवहार होणार नाही. व ताबडतोब तुमचे क्रेडिट कार्ड निकामी होईल. यामुळे संभाव्‍य आर्थिक फसवणुकीपासून तुमची सुटका होईल. यासाठी आपल्‍या क्रेडिट कार्डची एक झेरॉक्‍स कॉपी वेगळ्या ठिकाणी काढून ठेवा. जर तुमच्‍या क्रेडिट कार्ड वरून तुमच्‍या अपरोक्ष काही आर्थिक व्‍यवहार चोरट्यांनी केले तर मात्र तुम्‍हाला नजीकच्‍या पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार दाखल करावी लागते व यानंतर क्रेडिट कार्ड कंपनीच्‍या कस्‍टमर केअर विभागात तसे कळवावे लागते.
क्रेडिट कार्ड व्‍यवहार किंवा ऑनलाईन व्‍यवहार यासाठी सुरक्षितता कवच अधिकाधिक अभेद्य करण्‍याचे प्रयत्‍न चालू आहेत. कधी कधी त्‍यासाठी काही साधे व सोपे उपाय वापरले जातात. उदाहरणार्थ हॉंगकॉंग अँन्‍ड शांघाय बँक आपल्‍या क्रेडिट कार्ड यूजर्सना एक मनगटी घड्याळाएवढे इलेक्‍ट्रॉनिक उपकरण देते. यामध्‍ये एक बटन दाबले की वेगवेगळे नंबर डिजिटल स्‍वरुपात छोट्याशा स्‍क्रीनवर झळकतात. म्‍हणजे प्रत्‍येक वेळी जेव्‍हा तुम्‍ही क्रेडिट कार्डाचा उपयोग करून ऑनलाईन पेमेंट करता तेव्‍हा या उपकरणामधील नवीन इलेक्‍ट्रॉनिक क्रमांक पासवर्ड या स्‍वरुपात वापरायचा असतो. हा क्रमांक प्रत्‍येक वेळी वेगवेगळा येतो. बँकेने वितरण केलेल्‍या सर्व उपकरणांची माहिती सदर बँकेच्या वेबसाईटमध्‍ये उपलब्‍ध असते. प्रत्‍येक वेळी बटन दाबले की कोणता नवीन क्रमांक येणार याची देखील माहिती बँकेच्‍या वेबसाईटवर उपलब्‍ध असते. प्रत्‍येक वेळी जेव्हा तुम्‍ही तुमच्‍या पासवर्डच्‍या बरोबरीने जेव्‍हा हा आकडा संबंधित वेबसाईटवरून काही वस्‍तू विकत घेण्‍यासाठी टाईप करता तेव्‍हा हा नंबर संबंधित बँकेच्‍या डेटाबेसमधील नंबर्सबरोबर जुळत असेल तरच बँकेची वेबसाईट इंटरनेटवरून करावयाचे पेमेंट पुढे पाठविते.
एच.डी.एफ.सी. बँकदेखील अशा प्रकारची एक सुविधा पुरविते. या सुविधेमध्‍ये एच.डी.एफ.सी. बँकेच्‍या वेबसाईटवर योग्‍य त्‍या ठिकाणी तुमच्‍या मूळ क्रेडिट कार्डचा नंबर व तुम्‍हाला जितकी रक्‍कम खर्च करावयाची आहे तितकी रक्‍कम टाईप करून आभासी (virtual) क्रेडिट कार्ड तयार करण्‍यासाठी सदर वेबसाईटला सूचना द्यावयाची असते. यानंतर काही सेकंदामध्‍येच तुमचे आभासी क्रेडिट कार्ड तयार होते. म्‍हणजे असे की तुम्‍हाला वेबसाईटवरून रू. १००/- इतक्‍याच रकमेची खरेदी करावयाची असेल तर तुम्‍ही फक्‍त रूपये १००/- इतक्‍याच रकमेचे आभासी क्रेडिट कार्ड तयार करावयाचे. या क्रेडिट कार्डाचा नंबर तुमच्‍या मूळ क्रेडिट कार्डाच्‍या नंबरपेक्षा वेगळाच असतो. फक्‍त त्‍यावरील नाव तुमचे असते. हे आभासी क्रेडिट कार्ड तयार केल्‍यापासून पुढील २४ किंवा ४८ तासांमध्‍ये हे क्रेडिट कार्ड निकामी होते. या आभासी क्रेडिट कार्डाची माहिती इतर कोणत्‍या वेबसाईटवर गेली तरी आपल्‍याला काहीच फरक पडणार नसतो.
तसेच एच.डी.एफ.सी. बँकेच्‍या नेटबँकिंग वेबसाईटवर व्‍हर्चुअल की-बोर्ड असतो. या की-बोर्ड च्‍या  मागची तांत्रिक माहिती पुढीलप्रमाणे आहे. जेव्‍हा तुम्‍ही इंटरनेटवर व्‍यवहार/सर्फिंग करीत असता तेव्‍हा   तुमच्‍या नकळत तुमच्‍या कॉम्‍प्‍युटरमध्‍ये शिरकाव केलेली सॉफ्टवेअर्स तुम्‍ही पासवर्डकरिता कोणत्‍या की ज वापरत आहात हे बघत असतात. त्‍यामुळे या हेरगिरी करणा-या सॉफ्टवेअरर्सना चकवा देण्‍यासाठी स्‍क्रीनवर एक की-बोर्ड निर्माण केलेला असतो. या की-बोर्डवर माऊसने क्लिक केले की तुमचा पासवर्ड संबंधित ठिकाणी टाईप होतो. मात्र प्रत्‍यक्ष की-बोर्ड न वापरला गेल्‍यामुळे तुमचा पासवर्ड बाहेरच्‍या माणसाला समजण्‍याची शक्‍यता खूपच कमी होते.
आता तर इंटरनेटचा वापर करून आपला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्‍सेस व टॅक्‍स रिटर्नस् देखील भरता येतात. बँकेच्‍या वेबसाईटवर जाऊन, आपल्‍या खात्‍यामध्‍ये लॉग इन करून घरबसल्‍या फिक्‍स डिपॉझिट तयार करता येतात. चेकबुक, डिमांड ड्राफ्ट मागविता येतात. शेअर्सच्‍या आय.पी.. ज करिता मान मोडून फॉर्म भरण्‍याऐवजी अक्षरशः ३ ते ४ मिनिटांमध्‍ये आय.पी.. चा अर्ज भरून, योग्‍य त्‍या  रकमेसकट संबंधित ठिकाणी जमा करता येतो. या सर्व अत्‍याधुनिक सुविधांचा वापर करून आपले आयुष्‍य थोडे सोपे करता येते. त्‍यामुळे सुरक्षित उपायांचा अवलंब करून इंटरनेट बँकिंग व ऑनलाईन व्‍यवहार सावधगिरीने करणे हा यावरील मार्ग आहे.

या सर्व अत्‍याधुनिक सोई-सुविधा व अत्‍याधुनिक तंत्रज्ञान वापरतांना फार जपून वापरावे लागते कारण हे तंत्रज्ञान कोणा एकाची मक्‍तेदारी नाही. हे माहिती तंत्रज्ञान सुष्‍टांप्रमाणेच दुष्‍टांनादेखील तेवढेच उपलब्‍ध आहे. दुष्‍टांच्‍या हातात हे तंत्रज्ञान लागले तर ते त्‍याचा उपयोग/वापर त्‍यांच्‍या बुद्धीप्रमाणेच करणार. येथे कल्‍पनाशक्‍तीला पुरेपूर वाव आहे. म्‍हणूनच फारच सावधगिरीने या सोई-सुविधांचा वापर करायला हवा. गुन्‍हेगारी प्रवृत्तीच्‍या माणसाच्‍या हातामधील कॉम्‍प्‍युटर व इंटरनेट इतर लोकांची गोपनीय माहिती चोरण्‍यासाठी वापरले जातील. जितके आणि जेवढे प्रोग्रॅम्स आपल्‍याला उपलब्‍ध आहेत तितकेच प्रोग्रॅम्‍स गुन्‍हेगारी प्रवृत्तीच्‍या माणसांना देखील उपलब्‍ध आहेत. त्‍यामुळे हा धोका अधिकच वाढतो. आपण सरळपणे कॉम्‍प्‍युटर आणि इंटरनेट वापरतो म्‍हणून सर्वजणांनी या सुविधांचा उपयोग तसाच करावा अशी अपेक्षा आपण ठेऊ शकत नाही. त्‍यामुळे जेवढी गरज आहे तेवढाच वापर या तंत्रज्ञानाचा व या माहिती तंत्रज्ञानावर आधारित सोई-सुविधांचा करावा. याचा अर्थ असा नाही की आपण नवनवीन प्रयोग करू नयेत व माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित आपला उपयोग अगदीच प्राथमिक पातळीवर ठेवावा. तरी देखील नक्‍की   कोणत्‍या सोई-सुविधांची गरज आहे याचा विचार अवश्‍य करावा. एका कुटुंबाची गरज एका क्रेडिट कार्डाने भागण्‍यासारखी असेल तर पतीची चार आणि पत्‍नीची चार अशी आठ क्रेडिट कार्डे जवळ बाळगणे म्‍हणजे गोंधळाला निमंत्रण देण्‍यासारखे आहे. म्‍हणजे अशा आठ क्रेडिट कार्डाचे पासवर्ड, पिन क्रमांक इत्‍यादी सांभाळत बसायचे असा सगळाच व्‍याप वाढत जातो. याऐवजी उपयोगावर/गरजेवर आधारित इतक्‍याच सुविधा फायदेशीर/उपयुक्‍त/जीवन शांतीपूर्ण करणा-या ठरतात

Saturday, 10 December 2011

कॉम्‍प्‍युटरच्‍या प्रसारामुळे समाजावर होणारे परिणाम . . .

     इ.स. 1995 मध्‍ये आमच्‍या घरी कॉम्‍प्‍युटर आला आणि अचानक आमचे जीवनच बदलून गेले. आत्तापर्यंत मोकळा वेळ वाचन किंवा टी.व्‍ही बघणारे आम्‍ही मोकळ्या वेळामध्‍ये कॉम्‍प्‍युटर समोर बसून तो कसे काम करतो हे समजावून घेण्‍यामध्‍ये तासन् तास घालवू लागलो. घरातल्‍यांना वाटायचे की मुलगा अभ्‍यास करतो आहे. मात्र मुलगा कॉम्‍प्‍युटरवर वेगवेगळे प्रयोग करीत असायचा. भारतामधील मध्‍यमवर्गाला या कॉम्‍प्‍युटर क्रांतीमुळे तसेच इंटरनेटच्‍या झपाट्याने झालेल्‍या प्रसारामुळे रोजगाराचे नवीन मार्ग उपलब्‍ध झाले. हार्डवेअर पासून ते साधे कॉम्‍प्‍युटर टायपिंग करून देणे, तसेच कॉम्‍प्‍युटर शिकविणे इत्‍यादी अनेक सेवांची गरज भासू लागली. यामध्‍ये देखील चिकाटीने टिकून राहणा-यांची संख्‍या कमी होती. चार दिवस व्‍यवसाय चालला व नंतर दोन दिवस चालला नाही तर लगेच व्‍यवसाय बंद करणा-यांच्‍या हातून ही संधी अलगद निसटून गेली. आपल्‍या भारतीय समाजामध्‍ये पिढ्यानपिढ्या व्‍यवसाय-धंदा करणा-या समाजांनी या क्रांतीचा चांगलाच लाभ करून घेतला आणि ते योग्‍यच होते. नाहीतर मध्‍यमवर्गाला या सर्व सेवा कोण पुरविणार होते ?
अनेक मराठी लोक देखील कॉम्‍प्‍युटरचा हात धरून पुढे आले. जरा आपल्‍या आजूबाजुला पाहिले तर ही संख्‍या दुर्लक्ष करण्‍याइतकी निश्चितच नाही असे लक्षात येईल. 
अहो एका कॉम्‍प्‍युटरच्‍या अनुषंगाने किती प्रकारचे व्‍यवसाय केले जातात म्‍हणून सांगू ? लोकप्रीय टी.व्‍ही. मालिका तसेच क्रिकेटच्‍या मॅचेस सीडी/डीव्‍हीडी वर कॉपी करुन देणे हा कधी व्‍यवसाय होऊ शकेल असे स्‍वप्‍नात तरी वाटले होते का कुणाला? 
तर पहिला परिणाम कॉम्‍प्‍युटरच्‍या आगमनाचा असा झाला की अनेक मराठी माणसांना स्‍वयंरोजगारातील किंवा व्‍यवसायामधील स्‍वातंत्र्याचा लाभ मिळाला.

     कॉम्‍प्‍युटर येण्‍यापूर्वी ठराविक पद्धतीचे शिक्षण घेऊ न शकलेल्‍यांची संभावना अगदीच टाकाऊ म्‍हणून होत असे. त्‍याचे प्रमाण कमी झाले. तूलनेने कमी भांडवलामध्‍ये स्‍वयंरोजगाराच्‍या किंवा चांगली नोकरी मिळण्‍याच्‍या वाटा वाढल्‍या. 

     आणखी एक महत्‍वाचा परिणाम म्‍हणजे लोकांचा संपर्क वाढला. अगदी परवा परवा पर्यंत माझ्या यू.एस. मधील नातेवाईकांशी माझा संपर्क नव्‍हता. म्‍हणजे गेली दहा-पंधरा वर्षे. कोण एवढे पैसे खर्च करुन फोन करतोय म्‍हणा . . . . . . पण परवा तो नातेवाईक फेसबुकवर ऑनलाईन दिसल्‍यावर काय ? कसा आहेस . . . असा मेसेज मी अगदी सहजच टाईप केला. तर सांगायचा मुद्दा म्‍हणजे संपर्क ठेवणे हे अगदी सोप्‍पे झाले. 

     पूर्वी आपल्‍यापैकी बहुतेक जण साचेबद्ध विचार करायचे . . . मी सरसकट सर्वांविषई म्‍हणत नाहीये . . . माझ्यापेक्षा अनेक हुशार मंडळी आहेत हे मला माहीत आहे पण निदान मी तरी तसा होतो . . . कॉम्‍प्‍युटर वापरु लागल्‍याबरोबर हा साचेबद्ध विचार करण्‍याची प्रक्रिया मोडून पडली. आज काय कॉम्‍प्‍युटरमध्‍ये व्‍हायरस शिरला (ही बोली भाषा आहे . . . ), उद्या काय इंटरनेट कनेक्‍शन चालत नाही त्‍यामुळे इंटरनेटवरील मेल वाचता येत नाही, परवा काय कॉम्‍प्‍युटर चालू होतांन सी.पी.यू. ला धक्‍का लागल्‍यामुळे कॉम्‍प्‍युटर बिघडला एक ना दोन अनेक गोष्‍टी . . . एक ना दोन अनेक शक्‍यता . . . अनेक प्रकारची अनिश्चितता . . . या अनेक प्रकारच्‍या अनिश्चिततेचा सामना करण्‍यासाठी . . . अगदी व्‍यवसायामधील देखील . . . कॉम्‍प्‍युटरच्‍या प्रसारामुळे आपण तयार झालो. 

     पूर्वी शेअर मार्केट मध्‍ये व्‍यवहार करणे सर्वसामान्‍य मराठी माणसाच्‍या केवळ स्‍वप्‍नांमध्‍येच असायचे. आता निदान चांगल्‍या कंपन्‍यांचे शेअर्स घरबसल्‍या कॉम्‍प्‍युटरवरून विकत घेता येतात किंवा विकता देखील येतात. नियम जाणून घेऊन, नावाजलेल्‍या संस्‍थांमार्फत व्‍यवहार केल्‍यास फसवणुकीचा धोका आजीबात रहात नाही असे म्‍हणायला पूर्ण वाव आहे. 

     आपण घरबसल्‍या कॉम्‍प्‍युटर टायपिंग तसेच भाषांतराची कामे करुन देऊ शकतो. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवून देणे किंवा साधी वेबसाईट बनवून देणे हे देखील करु शकतो. स्‍थानिक संस्‍थेचा एखादा छोटा कार्यक्रम असेल तर त्‍यासाठी लागणारी निमंत्रणे इत्‍यादी सर्व कॉम्‍प्‍युटर, प्रिंटर, इंटरनेट इत्‍यादींचा वापर करुन करता येते. ज्‍येष्‍ठ नागरिकांना कॉम्‍प्‍युटर शिकविणे हा एक नवीनच रोजगार उपलब्‍ध झाला आहे. 


     बरे कॉम्‍प्‍युटरचा उपयोग एकाच प्रकारे आणि एकाच क्षेत्रामध्‍ये होतो असे नाही तर मानवी बुद्धीची जेथपर्यंत सीमा असेल तेथपर्यंत कॉम्‍प्‍युटरचा उपयोग होतो. चांगल्‍या हातामध्‍ये कॉम्‍प्‍युटर असेल तर सदुपयोग आणि वाईट हातांमध्‍ये कॉम्‍प्‍युटर असेल तर दुरुपयोग हे ओघाने आलेच. अकाउंटस् पासून व्‍हीडिओ एडिटिंग पर्यंत कोणताही विषय कॉम्‍प्‍युटरला वर्ज्‍य नाही आणि त्‍यामुळे कॉम्‍प्‍युटरचा वापर करुन कोण किती प्रगती करणार हे फक्‍त ज्‍याचे त्‍याने ठरवायचे आहे.

Tuesday, 18 October 2011

कॉम्‍प्‍युटर वापरणा-यांना होणारे आजार

पूर्वी आम्‍ही भावंडे शाळेमध्‍ये असतांना रोज रात्री आमची आई आमच्‍या डोक्‍याला तेल लावायची. अगदी कितीही उशीर झाला असला तरी हे काम ती न चुकता करायची. अगदी लहान असतांना डोक्‍यात काजळ देखील घालायची. हे आत्ता आठविण्‍याचे कारण म्‍हणजे कॉम्‍प्‍युटर समोर बसून डोळ्यांची आणि डोक्‍याची वाट लागते त्‍यावर वरील उपाय हा उत्तम उतारा आहे. म्‍हणजे अगदी सर्वांना लागू असे वर दिलेले उपाय आहेत. 

कॉम्‍प्‍युटर वापरतांना स्‍क्रीनवर नजर खिळवून काम करु नये, मध्‍ये मध्‍ये नजर बाजुला हटवावी. शक्‍य असेल तर खिडकी बाहेर बघावे. डोळ्यावर पाणी मारावे. 

तसेच कॉम्‍प्‍युटर समोर काम करावयास बसतांना आरामदायी खुची असावी. आरामदायी म्‍हणजे काय? तर अशी खुर्ची जिच्‍यामध्‍ये बसल्‍यावर तुमचे पाय खाली जमिनीला टेकतील. लटकत राहणार नाहीत. तसेच खुर्चीची पाठ चांगली रुंद असेल. हात ठेवण्‍यासाठी चांगली सोय असेल. हल्‍ली बाजारामध्‍ये गादीच्‍या खुर्च्‍या अनेक दुकानांमध्‍ये मिळतात पण त्‍या देखील सरसकट सर्वांना अनुकूल नसतात तेव्‍हा हा विषय दिसतो तेवढा सोप्पा नाही. तसेच कॉम्‍प्‍युटर ज्‍या टेबलवर ठेवणार ते टेबल देखील योग्‍य उंचीचे असावे. म्‍हणजे त्‍या टेबलावर ठेवलेला कॉम्‍प्‍युटर तुमच्‍या डोळ्यांसमोर बरोब्‍बर आला पाहिजे. तुमच्‍या डोळ्यांच्‍या व स्‍क्रीनच्‍या (मॉनीटर) मध्‍ये कमित कमी एक फुटाचे अंतर पाहिजे. हल्‍ली टीव्‍हीप्रमाणे दिसणारे स्‍क्रीन जवळजवळ बाद झाले आहेत व नवीन प्रकारचे स्‍क्रीन आले आहेत. या स्‍क्रीनमुळे डोळ्यांना कमी थकवा येतो.

सतत एकाच स्थितीमध्‍ये बसल्‍यामुळे खांदे आखडणे, पाठदुखी यांसारखे अनेक आजार कॉम्‍प्‍युटर वापरणा-यांना होतात. पण ते वेळीच लक्षात येत नाहीत. मग चिडचिड होते व या चिडचिडीचे रुपांतर आणखी त्रासदायक परिस्थितीमध्‍ये होते. मला देखील कॉम्‍प्‍युटर समोर सतत बसून बसून पाठदुखी जडली होती. मात्र वर्षभर भुजंगासनाचा नियमितपणे प्रयोग केल्‍यावर ती पाठदुखी सुटली. 

शक्‍य तेवढे चालणे, पाठीच्‍या कण्‍याला ताण देणारी योगासने करणे, शक्‍यतो सूर्यास्‍तानंतर कॉम्‍प्‍युटर समोर न बसणे हे काही साधे आणि सोपे उपाय केले तर आपली प्रकृती चांगली राहील. खूप चालण्‍यासाठी अगदी सकाळी लवकर उठणे जमत नसेल तरी देखील घराजवळ एखाद्या ठिकाणी जातांना स्‍कूटर किंवा गाडी वापरण्‍याऐवजी चालत जावे. स्‍टेशन घराजवळ असेल तर ऑफिसमधून येताजातांना रिक्षा करु नये. 

कॉम्‍पुटरचा स्‍क्रीन म्‍हणजे एक प्रकारचा टीव्‍हीच की, सतत टीव्‍हीसमोर बसून राहिले तर कसा थकवा येईल तसच थकवा सतत स्‍क्रीनसमोर बसल्‍यावर येतो. विचित्र प्रकारचा थकवा येतो. हा थकवा कमी करायचा असेल तर एकांतात बसावे. रात्री तासभर गच्‍चीवर जाऊन बसावे. गच्‍चीवर शक्‍यतो ट्यूबलाईट वगैरे नसते किंवा असल्‍यास बंद ठेवावी व शांतपणे बसावे किंवा फे-या माराव्‍या . . . . . करुन बघा . . . . आजार झाल्‍यावर उपचार करण्‍यापेक्षा वेळीच काळजी घेणे चांगले नाही का?